Saturday, July 27, 2024
spot_img
HomeGOVT SCHEMESSUKANYA SAMRUDHI YOJANA सुकन्या समृद्धी योजना : व्याजदरात केली...

SUKANYA SAMRUDHI YOJANA सुकन्या समृद्धी योजना : व्याजदरात केली वाढ

                 

                   ‘मुलगी प्रकाशमय पणतीसारखी असते’ असं म्हणत भारत सरकारनं ‘सुकन्या समृद्धी योजना’ आणली. ही लघु बचत योजना आहे. मुलींकरिता असलेली ही विशेष योजना आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे.

‘सुकन्या समृद्धी योजना

आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे

योजनेचे फायदे काय आहेत

सुकन्या समृद्धी  योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण असणार

‘सुकन्या समृद्धी योजना’   खाते कसे उघडणार

आवश्यक कागदपत्र

सुकन्या समृद्धी योजना फायदे काय?

सुकन्या समृद्धी योजना  अटी आणि नियम काय आहेत?

सुकन्या समृद्धी योजना   या योजनेला जनतेचा  प्रतिसाद कसा आहे?

सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढविले

 

आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे.

आपली  मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतरच या योजनेचा फायदा मुलीला मिळतो. मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी ही योजना सुरु करण्यात आलेलली  आहे.

योजनेचे फायदे काय आहेत

    मुलींबाबत भारतीय समाजाची मानसिकता आजही बदलली नाहीय. ही  पारंपारिक मानसिकता बदलण्यासाठी आणि मुलींच्या उगम भविष्याचा विचार करून, केंद्र सरकारनं बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेचा एक भाग म्हणून 22 जानेवारी 2015 रोजी ‘सुकन्या समृद्धी योजना’ योजना सुरू केली होती .भविष्यात मुलींचा आर्थिक भार आई-वडील किंवा पालकांच्या डोक्यावर पडू नये, अशा उद्देशानं ही योजना आणण्यात आलीय. मुलींच्या दूरवरच्या भविष्याचा विचार करूनच शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाचा या योजनेत विचार करण्यात आला आहे.

सुकन्या समृद्धी  योजनेसाठी पात्र लाभार्थी कोण असणार

  • खातेदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  • ‘सुकन्या समृद्धी योजना’ ची लाभार्थी मुलगीच असणार
  • एकच पालक किंवा कायदेशीर पालक त्यांच्या मुलीच्या नावे दोन खाती उघडू शकतात. काही अपवादात्मक प्रकरणांमध्येच अपवाद मान्य केले जातील.

 ‘सुकन्या समृद्धी योजना’   खाते कसे उघडणार

‘सुकन्या समृद्धी योजना’  योजनेसाठी किमान 250 रुपयांसह खातं उघडावं लागेल. त्यानंतर वर्षाकाठी दीड लाखांपर्यंत त्या खात्यात रक्कम जमा करता येणार तुमच्या घराच्या जवळील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत  तुम्हाला खातं उघडता येऊ शकतं.तसेच सार्वजनिक बँक किंवा कमर्शियल बँकेत खाते उघडता येईल.

आवश्यक कागदपत्र

अर्जासोबत महत्वाची कागदपत्र जोडावे लागणार. ओळखपत्र बंधनकारक आहे. मुलीचा आधार कार्ड, जन्मदाखला पत्ता म्हणून वापरता येणार.  ही संपुर्ण  कागदपत्रं अर्जासोबत जोडल्यानंतर ते पोस्ट ऑफिसकडे जमा करा.खातं उघडल्यानंतर पुढील 15 वर्षे कधीही न चुकता या खात्यात पैसे भरणं आवश्यक आहे. अकाऊंट उघडल्याच्या 21 वर्षांनंतर योजनेची मुदत संपनार आणि त्याचे पैसे खातेदाराला मिळतील.

उदाहरणार्थ

  • जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपये न चुकता भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी जवळपास 5 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे दर महिन्याला न चुकता 12,500 रुपये भरलेत, तर मॅच्युरिटीवेळी 71 लाख रुपये मिळतील.
  • जर तुम्ही 15 वर्षे वर्षाकाटी न चुकता 60,000 रुपये भरलेत, तर तुम्हाला मॅच्युरिटीवेळी 28 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.

सुकन्या समृद्धी योजना फायदे काय?

  • आयकर कायद्याच्या 80-C अंतर्गत या योजनेतील गुंतवणुकीला कर सवलत देण्यात आलीय.
  • या योजनेमुळे गरीब कुटुंबांसह निम्न मध्यमवर्गीय, मध्यम वर्गीय आणि इतर सामाजिक पार्श्वभूमी असलेल्यांना फायदा होईल. ही लाँग टर्म स्कीम आहे. त्यामुळेच वार्षिक व्याजाची पद्धत ही चक्रवाढ व्याजाची आहे. पर्यायानं परत मिळणारी रक्कमही वाढते.
  • मुलगी लग्नाच्या कायदेशीर वयाची झाल्यानंतर यात ठेवलेली रक्कम खर्चासाठी वापरता येईल.
  • मुलीच्या वयाच्या 21 वर्षांपर्यंत तुमच्या डिपॉझिटवर व्याज जमा होत राहतं. शिवाय, त्यात तुम्ही महिन्यात किंवा वर्षभरात कितीही वेळा त्यात पैसे भरू शकता.
  • मुलीच्या 21 व्या वर्षांनंतरही जर यातले पैसे काढले नाही, तर त्या पैशांवरील व्याज नियोजित दरानं वाढतच जातो.
  • मुलीचे आई-वडील किंवा पालक इतर ठिकाणी स्थलांतरित झाले, तर तिथे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ट्रान्स्फर करता येतं.

सुकन्या समृद्धी योजना  अटी आणि नियम काय आहेत?

  • जिच्या नावाने अकाऊंट आहे, त्या मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वत: अकाऊंट हाताळू शकते. 18 वर्षांनंतर अकाऊंट मुदतपूर्वी बंदही करता येऊ शकतं.
  • अत्यंत महत्वाचं आणि तातडीचं कारण असल्यास अकाऊंटमधून आधीही पैसे काढता येऊ शकतात. मात्र, यासाठी काही नेमकी कारणंच ग्राह्य धरली जातील.
  • मुदतपूर्व अकाऊंट तेव्हाच बंद करता येईल, जर गंभीर आजाराचं कारण असेल किंवा वैद्यकीय गंभीर कारण असेल.

सुकन्या समृद्धी योजना   या योजनेला जनतेचा  प्रतिसाद कसा आहे?

सुकन्या समृद्धी योजनेला जनतेचा  प्रतिसाद चांगला दिसून येतोय. विशेषत: पोस्ट ऑफिसमार्फत या योजनाचा चांगला प्रचार आणि प्रसार केला जातोय.हा प्रसार केवळ पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्यांपुरताच केला जात नाहीय, तर अंगणवाडी सेविका, शिक्षक, सरपंच यांच्या माध्यमातून सर्वत्र केला जातोय.

शाळांमधील शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थिंनींच्या पालकांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यास सांगितली जातेय. ग्रामसभेदरम्यान सरपंच आणि त्या भागातील पोस्ट मास्टर यांच्या मदतीने योजनेची माहिती गावांमध्ये पोहोचवली जातेय.

सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढविले

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने भेट दिली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी या योजनेचा व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेवर गुंतवणूकदारांना ८ टक्के व्याज दिले जात होते.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी 1800 266 6868 या मोफत नंबरवर संपर्क करू शकता.

 

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page