अयोध्या येथिल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करून येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना वीज बिलामधुन दिलासा मिळावा यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत सध्या एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. तर ही योजना कशी असणार आहे याबाबत मी आपणास माहिती देत आहे.
घरांवर रूफटॉप सोलर बसवणार
ही योजना देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेसाठी असल्याचं स्पष्ट झालेले आहे. या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर बसविण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांना मोफत वीज मिळणार आहे. रूफटॉप सोलर बसविल्यानंतर वीज बिल जवळपास अर्ध्याने किंवा त्यापेक्षा कमी होणार आहे. या पॅनल्समध्ये सोलर प्लेट बसवण्यात आल्या आहेत. सूर्यकिरणांमधून ऊर्जा शोषून वीजनिर्मिती करणारे हे तंत्रज्ञान आहे. पॅनेलमध्ये फोटोव्होल्टेइक सेल स्थापित केले जातात जे सौर ऊर्जेला विजेमध्ये रूपांतरित करतात. ही वीज पॉवर ग्रीडमधून येणाऱ्या विजेप्रमाणेच काम करणार.
या योजनेचे लाभार्थी
जिथे वीज सर्वात महाग आहे. अश्या राज्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे.तसेच वीज बिलामुळे अनेक पक्ष निवडणुकीच्या काळात मोफत वीज देण्याचे आश्वासनही देतात अश्या सुध्दा राज्यांना या योजनेचा लाभ् मिळणार आहे. सध्या महाराष्ट्र हे देशातील सर्वात महागडे राज्य आहे. म्हणजेच या योजनेचा सर्वाधिक फायदा येथे राहणाऱ्या लोकांना होणार आहे. तसेच उत्तर प्रदेश, गुजरात व इतर अनेक राज्यांमध्ये वीज बिल सर्वाधिक आहे, या राज्यांमध्ये लोकांकडून प्रति युनिट 7 रुपयांपेक्षा जास्त शुल्क आकारले जाते. अशावेळी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवल्यानंतर लोक त्यापासून सुटका मिळवू शकतात.
lek-ladaki-yojanaलेक-लाडकी-योजना अधिक माहिती जाणून घ्या
या योजनेला सूर्योदय योजना असे नाव का देण्यात आले.
हे रूफटॉप सोलर पॅनल सूर्यकिरणांमधून ऊर्जा शोषून वीजनिर्मिती करणारे हे तंत्रज्ञान आहे. ते सूर्यप्रकाशाने चार्ज होतील आणि रात्री लोकांच्या घरांना उजळून टाकतील. त्यामुळेच या योजनेला सूर्योदय योजना असे नाव देण्यात आले आहे.