Sunday, September 15, 2024
spot_img
HomeBlogSmart Ring A New Technology: One That Will Improve Health स्मार्ट रिंग...

Smart Ring A New Technology: One That Will Improve Health स्मार्ट रिंग घालण्यायोग्य एक नविन तंत्रज्ञान: ज्यामुळे आरोग्याचा आलेख होईल सुखरुप

स्मार्ट रिंग्स Smart Ring 2024 ही पहाण्यासाठी लहान पण कामात भारी आणि जे तुम्ही तुमच्या बोटात घालुन तुमच्या आरोग्याचा आलेख व इतरही बाबी तुम्ही तपासु शकता  स्मार्ट रिंग हे आपल्या बोटात घाला आणि  फॅशनसह तंत्रज्ञानाचे स्वागत करा.

पण स्मार्ट रिंग म्हणजे नेमके काय आणि ते काय करू शकतात? याबाबत सविस्तर माहिती पाहूया.

 

स्मार्ट रिंग काय आहेत?

 

 

smart ring A new technology: one that will improve health
smart ring A new technology: one that will improve health

दिसायला लहान पण तेवढीच पॉवरफुल. स्मार्ट रिंग्स एका छोट्या रिंग-आकाराच्या उपकरणात प्रभावी तंत्रज्ञान आहे. स्मार्टवॉच प्रमाणे ती  आपल्याआरोग्यातील बदलाचे  निरीक्षण करू शकतात, इतर उपकरणांवर नियंत्रण ठेवू शकते आणि बरेच काही आहे या अंगठी मध्ये . प्रगत सेन्सर्ससह सुसज्ज अशी ही  स्मार्ट रिंग हृदय गती, रक्तातील ऑक्सिजन पातळी, झोपेची गुणवत्ता, तुम्ही कीती वेळ चालता , आणि अगदी ताणतणाव पातळीसह मोजमाप करु शकते. त्यानंतर त्या रिंग चा डेटा कनेक्ट केलेल्या स्मार्टफोन ॲपवर आपण पाहु शकतो, ज्यामुळे आपणास ट्रेंडचे विश्लेषण करता येते आणि आपल्या आरोग्य सुधारणे कडे लक्ष देता येते.

काही  तर, स्मार्ट रिंग  असे आहेत की, जेश्चर कंट्रोल्स आणि नोटिफिकेशन्ससाठी साठी प्रसिध्द आहेत. उदाहरणार्थ, रिंग मुळे एक बोटाला  एक साधा झटका लागतो आणि ते  तुम्हाला सुचविते की स्मार्ट दिवे मंद करा किंवा प्लेलिस्ट तयार करणे यासारख्या गोष्टी करू देतो. जेव्हा एखादा कॉल किंवा संदेश येतो, तेव्हा बोटावर एक सूक्ष्म बझ तुम्हाला तुमचा फोन न घेता कळून  येतो.आहे की नाही मज्जा

जेव्हा ती रिंग  तुम्ही तुमच्या बोटात घालाल तेव्हा आतील भागात’अंडरबेली’ सेन्सर्सने पॅक असेल परंतु  बाहेरील भाग सामान्यत: गुळगुळीत, अखंड धातूचा असतो.म्हणजेच आपल्या सामान्य अंगठी सारखा.

स्मार्ट रिंग  कोणकोणते कार्य करु शकते?

आरोग्य फिटनेस तपासणे-  स्मार्ट रिंग्सद्वारे आपन आपल्या आरोग्याचा आलेख नियमित पाहु शकतो. त्यांच्या लहान, सूक्ष्म स्वरूपाच्या घटकामुळे, स्मार्ट रिंग दिवसाचे 24 तास आरामात परिधान करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत, अगदी झोपेत असताना कोणतीही अडचण  किंवा अस्वस्थता न आणता. हे सतत परिधान करण्याची वस्तु आहे. अर्थातच स्मार्ट रिंग नेहमी वापरकर्त्याच्या बोटावर राहण्याची अधिक शक्यता असते, त्यामुळे ती रात्रंदिवस आरोग्य डेटा गोळा करीत असते.

ओरा रिंग हे त्यातील च एक  सर्वात लोकप्रिय उदाहरण आहे जे तुम्हाला तुमच्या आरोग्यावर आणि निरोगीपणावर लक्ष ठेवू देते.

मूड सुधारण्यात- आपण कसे आनंदी कसे राहु,समाधानी कसे राहु या बाबत सुध्दा हॅप्पी रिंग घालण्याने आपल्या मनाचे किंवा आपल्या मुड सुधारण्याचे कार्य रिंग करीत असते.

पेमेंट करणे- McLear RingPay सारख्या रिंगमुळे तुम्हाला तुमचे बँक खाते किंवा कार्ड रिंगशी लिंक करता येते. त्यानंतर, तुम्ही सुसंगत पॉइंट-ऑफ-सेल सिस्टमसह स्टोअरमध्ये खरेदी करत असताना, तुम्ही पेमेंट पूर्ण करण्यासाठी टर्मिनलवर हात फिरवू शकता. काही रिंग तुम्हाला तुमचा फोन रिंगवर टॅप करून पेमेंट करू देतात,

स्मार्ट होम कंट्रोल- SMART रिंग वापरण्याचा अजुन एक फायदा म्हणजे तुम्ही रिंगमुळे तुमच्या घरचे दरवाजे बंद करु शकता,घरातील लाईट बंद करु शकता. रिंग घातलेल्या  तुमच्या बोटाच्या साध्या स्पर्शाने दरवाजे आणि गेट्स अनलॉक करता येतात. भविष्यात तर काही कंपन्या रिंग वापरून तुमची कार सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

स्मार्ट रिंगचे  वापरण्याचे अडचण  कोणती आहे?

या रिंग आपल्या बोटात फिट होणार या योग्य आकारात उपलब्ध होणार ही एक मोठी समस्या आहे. कारण या रिंग  तुमच्या बोटांच्या अचूक आकाराशी जुळणे आवश्यक आहे.दुसरी अडचण म्हणजे रिंग हे काही स्वतंत्र उपकरण नाही ते आपल्या स्मार्टफोनला पूरक उपकरण म्हणून वापरले जानार आहे.म्हणजेच आपल्या फोन ला ते कनेक्ट असणार आहे.

त्यामुळे जरी या क्षणी स्मार्ट रिंग्स कमी आरोग्य मेट्रिक्सचा मागोवा घेऊ शकतात, तरीही वापरकर्त्याच्या शरीराशी त्यांचा दीर्घकाळ आणि अखंड संपर्क उत्तम दीर्घकालीन आरोग्य डेटा संकलन आणि नमुना विश्लेषणाची क्षमता प्रदान करतो, ज्यामुळे ते वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्यातील अनियमिततेबद्दल अधिक चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात.

 कोणकोणत कंपीची स्मार्ट रिंग बाजारात असणार

सॅमसंगची गॅलेक्सी रिंग या वर्षाच्या शेवटी लॉन्च होणार आहे . कोणतीही स्मार्ट रिंग अद्याप मुख्य प्रवाहात आलेली नाही, Apple , Samsung, Huawei या नामांकित कंपनीचे तुम्ही स्मार्ट रिंग परिधान करु शकणार आहात. BoAt Smart Ring किंवा Noise’s Luna Ring सारख्या मॉडेल्समध्ये  सुध्दा स्मार्ट रिंग तुम्ही घेउ शकणार.

भविष्यात स्मार्ट रिंग ही प्रत्येक व्यक्तीच्या बोटात आपल्याला दिसणार आहे. मधुमेहीं सारख्या बिमारीकरीता तर ते एक वरदानच असणार आहे. रक्तातील साखर तपासण्यासाठी बोटे टोचण्याची गरज असणार नाहीत, कारण रिंग्ज 24/7 वर राहतात. रक्तदाब आणि ग्लुकोजच्या पातळीचे सतत रिअल-टाइम मॉनिटरिंग सक्षम करून, या महत्त्वपूर्ण आरोग्य मेट्रिक्सवर लक्ष ठेवु असणाऱ्या  लाखो लोकांसाठी स्मार्ट रिंग अपरिहार्य परिधान करण्यायोग्य  एक महत्वाची वस्‍तु ठरणार आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page