Saturday, July 27, 2024
spot_img
HomeFOOD7 Amazing Summer Beverages You Must Drink To Beat The Heat 7...

7 Amazing Summer Beverages You Must Drink To Beat The Heat 7 आश्चर्यकारक उन्हाळी पेये तुम्ही उष्णतेवर मात करण्यासाठी पिउ शकता.

उन्हाळा (Summer) सुरु झालेला आहे. या ऋतु मध्ये आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या आहाराकडेही जास्त लक्ष द्यावे लागते. अतिशय उन  आणि घामामुळे आपणास थकवा जाणवतो. या ऋतु मध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे ही देखील समस्या निर्माण होते. अश्यावेळेस अनेक प्रकारचे थंड आणि आरोग्यदायी (Health) पेयांचा आहारामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश केला पाहिजे. ही आरोग्यदायी  पेये उष्णतेपासून आपले संरक्षण करतात. तसेच शरीर सुध्दा थंड ठेवतात. ही पेय पिल्यास आपल्या शरीरातील  उत्साह टिकुण राहतो. ते शरीराला हायड्रेट ठेवतात. त्यात कॅलरीजचे (Calories) प्रमाणही जास्त नसते. या पेयांमध्ये ताक, लिंबू शरबत, जलजीरा आणि नारळ पाणी इत्यादींचा समावेश होतो. या पेयांमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि लोह असते, यामुळे यांचा आहारामध्ये समावेश करणे महत्वाचे आहे.

लिंबू शरबत:

उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असलेले पेय म्हणजे लिंबू शरबत . हे शरबत अतिशय लवकर तयार होते.तसेच ते चवदार सुध्दा असते. हे शरबत पुदिन्याची पाने, लिंबू, साखर, मीठ आणि पाणी वापरून तयार केले जाते. आपण त्यात  जिरे पावडर, मिरपूड, इत्यादीसारखे मसाले देखील टाकुण वापरु शकता.

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. आणि शरीरास नवी ऊर्जा देते.

नारळ पाणी (शहाळ्याचे पाणी) :

शहाळे किंवा नारळ हे शरीरामधील झालेली पाण्याची कमतरता  पूर्ण करून शरीरास उर्जा  देते. यामध्ये नैसर्गिकरीत्या असलेले पोटॅशियम पाण्याची कमी होऊ देत नाही. नारळ पाणी  बाराही महिने  पिणे हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यामुळे आपले त्वचा कोमल होण्यासही मदत होते.

ताक :

सर्वात सहज उपलब्ध होणारे पेय म्हणजे ताक.उन्हाळ्यात ताक पिणे अत्यंत फायदेशीर ठरते.  या दिवसात अन्न पचवण्यासाठी ताकाचे सेवन करावे. यामुळे पोटातील उष्णता कमी होण्यास मदत होते. ताक हे प्रोबायोटिक पेय आहे. हे आतड्यासाठी खूप चांगले आहे. हिंग, चिरलेली कोथिंबीर, पुदिना आणि दही वापरून बनवले जाते.

जलजीरा:

उन्हाळ्यात जलजीरा पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जलजीरा हे जिरे, आले, काळी मिरी, पुदिना आणि वाळलेल्या कैरीची पावडर वापरून बनवले जाते. या मसाल्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे अनेक पोषक घटक असतात. ते मळमळ, सूज आणि अपचन दूर करण्यासाठी कार्य करतात.

आम रस (पन्ना) :

आंब्याला फळाचा राजा असे म्हणतात.आम रस हे महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय आहे.आम पन्ना हे पेय आपणास  ताजेतवाने ठेवते व  उन्हाळयात  ऊर्जा देते . या  आम पन्नात जर जिरे आणि पुदिन्याच्या पानांचे मिश्रण थोडेसे टाकले तर  त्या आम पन्ना  ची चवीत पुन्हा भर पडेल.

उसाचा रस

नैसगिक असलेला उसाचा रस अनेक समस्यांवर रामबान उपाय म्हणून वापरला जातो . हे एनर्जी ड्रिंक आहे  आणि प्लाझ्मा आणि शरीरातील द्रव तयार करण्यात मदत करते, ज्यामुळे तुम्हाला शरीरातील पाण्याची पातळी वाढविते. बर्फ टाकुण उसाचा रस पिण्यापेक्षा साधा उसाचा रस पिणे शरीराला फायदेशिर होते.

टरबूज रस

टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात स्वादिष्ट सेंद्रिय उत्पादनांपैकी एक आहे आणि त्याचा रस खूप उत्साहवर्धक आहे.

टरबूजमध्ये सुमारे 90% पाणी असते, ज्यामुळे टरबूज च्या सेवनाने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते.

वरील सर्व पेये ही ऊर्जा देणारी आहेत. यामुळे शरीराला फायदा होतो आणि थकवा नाहीसा होतो.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page