भारत हा कृषी प्रधान देश आहे.पुर्ण भारतभर 23 दिसंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणुन साजरा केला जातो.देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि लोकांच्या विकासामध्ये शेतकऱ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.
राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे महत्व:
देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि लोकांच्या विकासामध्ये शेतकऱ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.आमच्या देशातील शेतकऱ्यांना अन्नदाता चा दर्जा प्राप्त आहे.शेतकरी हा आपल्या शेतात अतिशय मेहणत करित असतो .उन,वारा,पाउुस या कशाचीही चिंता न करता तो सतत आपल्या शेतात राबत असतो त्यांचा मेहनतीनेच आज देशातील प्रत्येकाला अत्र मिळत आहे .हा दिवस खरोखरच त्याचा मेहणतीचा आदर करण्याचा दिवस आहे.आज शेतकऱ्यांचा गौरव होणे महत्वाचे आहे.त्याकरिता 23 दिसंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणुन साजरा केला जातो.
राष्ट्रीय शेतकरी दिवसाचा इतिहास:
भारताचे पुर्व प्रधानमंत्री चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस २३ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणुन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ ला उत्तर प्रदेश मधील मेरठ जिल्हयातील नूरपुर या गावात एका मध्यमवर्गीय शेतकरी परिवारात झाला, त्यांना शेतकऱ्यांचा कष्टाची ची जानीव होती त्यांनी शेतकऱ्यांना अतिशय मानाचे स्थान दिले .त्यांचा कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांकरिता महत्वाचे कामे केले.त्यांचा स्मरनार्थ हा दिवस राष्ट्रीय शेतकरी म्हणुन साजरा केला जातो.
शेतकरी दिवस 2023 ची थीम:
कोणता पन दिवस साजरा करण्याकरिता त्याची की थीम निर्धारित केली जाते. प्रतिवर्ष या दिवसाची एक वेगळी थीम असते राष्ट्रीय शेतकरी दिवस 2023 ची थीम आहे “शाश्वत अन्न सुरक्षा आणि लवचिकतेसाठी स्मार्ट समाधान प्रदान करणे” (Delivering Smart Solutions for Sustainable Food Security and Resilience) या थीम सोबत हा दिवस पुर्ण भारत देशात मध्ये हर्षो-उल्लास सोबत साजरा केला जात आहे.