Saturday, July 27, 2024
spot_img
HomeFOODTurmeric Facts बहुगुणी अशी ही हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित...

Turmeric Facts बहुगुणी अशी ही हळद! हळदीचे हे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

 

तसे पाहल तर हळदीची कथा दक्षिण आशियामध्ये, विशेषतः नेपाळ आणि भारतात सुरू होते. हजारो वर्षांपासून, हळद केवळ चव वाढवणारी म्हणुन नाही ,तर  ती एक आदर्श औषधी वनस्पती होती. वेदना आणि वेदना शांत करण्यासाठी, संक्रमणाशी लढण्यासाठी हळदीचा उपयोग करतात.

हळद ही भारतीय लोकांच्या आहारामधील अविभाज्य घटक आहे. हळदीमध्ये  अनेक प्रतिजैविक गुणधर्म आढळून येतात. हळदीच्या नियमित सेवनामुळे आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. हळदीमध्ये कर्करोगापासून बचाव करणारे देखील अनेक घटक असतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते, जे कॅन्सरला वाढण्यापासून रोखते.तर ही बहुगुणी हळद अनेक देशात परदेशात प्रसिध्द आहे.तर पाहुया कोणत्या देशात ती जास्त प्रसिध्द आहे.

नेपाळमधील प्रसिध्द हळद

नेपाळी हळद इतकी खास का आहे?याचे उत्तर होय नेपाळी हळद खास आहे .त्याचे अनेक कारण आहे. हिमालयी माती हळदीसाठी आदर्श वाढणारी परिस्थिती निर्माण करते,  हिमालयाच्या सुपीक पायथ्याशी उगवलेल्या नेपाळी हळदीला तीव्र सुगंध, मातीची चव आणि कर्क्युमिन नावचे तत्व  आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन या गुणधर्मामुळे हळद ही आरोग्यवर्धक आहे.

नेपाळचा  शेतकरी हा शेतीमध्ये  शाश्वत पद्धती वापर करतात, रासायनिक खताशिवाय  त्यांच्या पिकांचे पालनपोषण करतात. त्यामुळे सुध्दा तेथिल हळद चवदार आहे.

 

हळदीचे प्रकार

हळदीच्या इतर प्रजाती आहेत आणि त्या सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सर्व प्रजातींच्या हळदीमध्ये एंटीसेप्टिक, अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांसह इतर अनेक गुणधर्म आणि पोषक तत्वे असतात. जरी हळदीच्या अनेक प्रजाती ( Types of Turmeric Species ) आढळतात, परंतु त्याच्या चार प्रजाती ज्या अगदी सामान्य आहेत आणि ज्यांचा आयुर्वेदात देखील उल्लेख आहे, त्या खालीलप्रमाणे आहेत.

•           पिवळी हळद ( Yellow turmeric )

•           काळी हळद ( Black Turmeric )

•           जंगली/कस्तुरी हळद ( Wild/Musk Turmeric )

•           पांढरी हळद ( White turmeric )

हळदीचे उपयोग

हळद ही भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य अंग असून, त्याचा वापर अन्न, सौंदर्य प्रसाधने, पारंपरिक कर्मकांडे व विधी, औषधे, रंग अशा अनेक  बाबींमध्ये केला जातो.

भारतीय पाककृतींमध्ये हळदीचा वापर होतो. तसे पाहल्यास प्रत्येक शाकाहारी वा मांसाहारी पदार्थांत  हळदीचा वापर होतो.

आयुर्वेदातही हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. अनेक आयुर्वेद उपचारात हळदीचा वापर  केला जातो.

 

औषधी गुणधर्म

लहान सहान आजारामध्ये हळदीचा उपयोग केला जातो. मुख्यतः घशाला संसर्ग झाला असल्यास कोमट  दुधात चिमुटभर हळद घालून प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

हळदीमुळे जिवाणूंच्या वाढीस प्रतिबंध होतो.  हळदीचा वापर जखमांवर लावण्यासाठी केला जातो. त्यातील अँटिसेप्टीक गुणधर्मामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

आपल्या आहारात हळदीचा उपयोग केल्याने शरीरातील  पित्त वाढत असले तरी जेवण पचण्यास मदत होते.

हळदीमधील एका अँटीऑक्सिडेंट घटकाचा उपयोग कर्करोगाच्या पेशींना नष्ट करण्यासाठी होऊ शकतो.

आपले पोट साफ होत नसल्यास गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून ते पाणी पिणे. यामुळे  आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.  तसेच पोटही साफ होते.

हळद योग्य प्रमाणात सेवन केल्यास ती आरोग्यास खूप फायदेशीर ठरू शकते

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page