Saturday, July 27, 2024
spot_img
HomeCURRENT AFFAIRSSakshi Malik (साक्षी मलिक) रिओ ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीतून निवृत्ती...

Sakshi Malik (साक्षी मलिक) रिओ ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली

ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची एकमेव महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने गुरुवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांसमोर कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली .साक्षी मलिक, हिने बर्मिंगहॅम येथे 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये शेवटचा भाग घेतला होता. भारतीय कुस्तीपटूने महिलांच्या 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले पण तेव्हापासून तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला नाही.

साक्षी मलिक चा परिचय
साक्षीचा जन्म 3 सप्टेंबर 1992 रोजी हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला. अवघ्या 17 व्या वर्षी तिने 2009 आशियाई ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 59 किलो फ्रीस्टाइलमध्ये रौप्य पदक जिंकले होते., त्यानंतर साक्षी ने 2010 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. साक्षी मलिक ने भारतातील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी महिला कुस्तीपटूंपैकी एक म्हणून स्वत:ला सिद्ध केले.
2013 कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, साक्षी मलिकने पुढच्या वर्षी ग्लासगो येथे तिची पहिली राष्ट्रकुल स्पर्धा लढवली आणि 58 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रौप्य पदक जिंकले. तिने 2018 मध्ये 62 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवून तिचे दुसरे राष्ट्रकुल क्रीडा पदक जिंकले होते आणि शेवटी चार वर्षांनंतर त्याच गटात सुवर्णपदक जिंकले होते.अशाप्रकारे तिचा यशाचा आलेख चढता असायचा.
रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिक हिने महिला कुस्तीपटू म्हणुन जिंकलेले हे भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक होते.

साक्षीने मलिक ने 2010 च्या युथ ऑलिम्पिक गेम्सचा कांस्यपदक विजेता आणि 2016 कॉमनवेल्थ चॅम्पियन असलेला सहकारी भारतीय कुस्तीपटू सत्यवर्त कादियनशी विवाह केला आहे.

आणि ती सध्या रोहतकमध्ये वास्तव्यात आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page