Sunday, September 15, 2024
spot_img
HomeELECTRIC GADGETSMobile मोबाईल चोरी गेल्यास लगेच असे करा ब्लॉक, कोणालाही वापरता येणार नाही,...

Mobile मोबाईल चोरी गेल्यास लगेच असे करा ब्लॉक, कोणालाही वापरता येणार नाही, डिटेल्सही राहील सुरक्षित

आपला   मोबाईल हा आपल्या रोजच्या जीवनातील  एक महत्वाचा भाग  बनलाय ज्याच्या वापराशिवाय आपली सगळी कामं अशक्य आहेत.तो थोडा वेळ जरी दिसला नाही तरी आपले मन रमत नाही आणि

अशात जर आपला मोबाईल कुठे जर हरवला किंवा चोरीला गेला तर आपले मोठं नुकसान होते. तुमची पर्सनल डिटेल्स स्कॅमर्सपर्यंतही पोहोचू शकते. तेव्हा अशा स्थितीत आपन घाबरुन न जाता  काय करावे   याबाबत आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

तुमचा फोन हरवल्यास सर्वप्रथम तुम्ही CEIR वेबसाइटला भेट द्यावी. इथे तुम्ही चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल ब्लॉक करू शकतो. एवढेच नाही तर तुमचा फोन परत मिळाल्यास तुम्ही मोबाईल अनब्लॉक देखील करू शकता. हे काम कसे करायचे ते आपण जाणून घेऊया.

CEIR वेबसाइटवर तक्रार करणे

CEIR ही सेवा सर्व राज्यांमध्ये उपलब्ध आहे. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या स्मार्टफोनची तक्रार प्रथम  CEIR  ला नोंदवा .याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील सिम कार्डचा मोबाइल नंबर, IMEI नंबर आणि मोबाइल पावती यासारख्या तपशीलांची आवश्यकता असेल.हे सगळे तपशिल घेउन तुम्ही CEIR तक्रार नोंदवु शकता.

पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी.

तसेच  तुम्हाला तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी लागेल कारण तुम्हाला फोन ब्लॉक करण्यासाठी स्मार्टफोन यूजरच्या डिटेल्ससह पोलिस तक्रारीची डिजिटल कॉपी देखील आवश्यक असेल.

जेव्हा तुम्ही CEIR या वेबसाईटला  स्मार्टफोन ब्लॉक करता, तेव्हा तो केंद्रीय डेटाबेसवरील ब्लॉकलिस्टमध्ये जातो आणि तुमचा हरवलेला फोन ब्लॉक होतो. मग तुमचा मोबाईल कोणीही वापरू शकणार नाही.

 आपला मोबाईल सापडला तर अनब्लॉक कसा करायचा?

अपला  चोरीला गेलेला किंवा हरवलेला मोबाईल सापडला असल्यास, आपन तो येथून अनब्लॉक देखील करू शकता. आपल्यला  हे फक्त CEIR वेबसाइटद्वारेच करावे लागेल.

यामध्ये आपणास रिक्वेस्ट आयडी आणि मोबाईल नंबर यांसारखे डिटेल्स टाकावे लागतील आणि त्यानंतर फोन अनब्लॉक करावा लागेल.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page