आयपीएल लिलाव 2024 लिलाव दुबईमध्ये आयोजित केला जात आहे. जिथे सध्याचे आयपीएल संघ आपल्या आवडत्या खेळाडूंना संघात समाविष्ट करण्यासाठी बोली लावत आहेत. आतापर्यंत झालेल्या लिलावात आयपीएलचे यापूर्वीचे विक्रम मोडीत निघालेले दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्व विक्रम मोडीत काढत IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेतले. विशेष म्हणजे आजच्या लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स काही काळापूर्वी आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. आता त्याच्याच सहकाऱ्याने आपल्या कर्णधाराचा विक्रम मोडीत काढत सर्वात महागड्या खेळाडूचा दर्जा मिळवला आहे.
मिचेल स्टार्क वरती एक नजर
टेस्ट- 83 मैच 338 विकेट
वनडे- 121 मैच 236 विकेट
टि 20- 58 मैच 73 विकेट
आयपीएल- 27 मैच 34 विकेट