महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना 1,01,000 रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे. या योजनेचे नाव लेक लाडकी योजना आहे. राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली आहे. यासोबतच राज्य सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही योजना महिलांच्या समस्या चे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लेक लाडकी योजना lek ladaki yojana अजूनही शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आलेली नाही. या योजनेची 2023 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजने बाबत संपूर्ण माहिती पाहूया.
लेक लाडकी योजना चा उद्देश
लेक लाडकी अभियान व योजनेअंतर्गत देशातील गरीब कुटुंबातील मुली त्यांच्या जन्मापासून तर शिक्षणापर्यंत अशा मुलींना आर्थिक मदत करुण मुलींचा विकास करणे हा सर्वात मोठा उद्देश लेक लाडली योजनेचा आहे. तसेच मुलींच्या होणारया गर्भ पात यावर आडा घालने. तसेच मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे तसेच मुलींच्या उज्वल भविष्यासाठी लेक लाडकी योजना महत्वाची ठरणार आहे.
लेक लाडकी योजना चे स्वरुप
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे स्वरुप खालीलप्रमाणे असणा आहे.
1) मुलीचा जन्म झाल्यानंतर प्रथमतहा तिच्या नावावर 5,000 रुपये जमा केले जातील.
2) जेव्हा मुलगी चौथीत जाणार तेव्हा तीच्या नावावर 4,000 रुपये जमा केले जातील.
3) सहावीत असताना 6,000 रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जाते.
4) मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 रुपये जमा केले जाते.
5) लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतर तिला 75,000 हजार रोख मिळतील
लेक लाडकी योजनचे लाभार्थी-
महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी लाभार्थी पात्रता काय आहे ? या योजनेसाठी कोणीही फार्म किंवा अर्ज करू शकतो. लेक लाडली योजनेसाठी खालीलप्रमाणे नियम व अटी आहेत.
1) लेक लाडकी योजना साठी पात्र असण्यासाठी उमेदवार ही महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
2) लेक लाडकी योजना 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आहे.
3) राज्यातील पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र राहतील.
4) या योजनेसाठी लाभार्थी मुलीचे बँक खाते उघडणे आवश्यक राहील.
5) कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना होणार. जुळयांपैकी मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.
अश्याप्रकारे ही योजना कार्यन्वीत होणार आहे.