मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून लाडली बहना ही महत्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचे फलित त्यांना विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.
त्यामुळे महाराष्ट्र देखील लाडली बहना योजना सुरू करण्यासाठी शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार लवकरच या योजनेवर विचार करून तिला महाराष्ट्रात देखील सुरू करणार आहे. याबाबतची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी दिलेली आहे.
मुख्यत्वे लाडली बहना या योजनेमुळेच मध्य प्रदेशात भाजपने एकहाती विजय मिळवला आहे. त्याचमुळे आता या योजनेला महाराष्ट्रात देखील राबवण्याचा सरकारचा विचार आहे. सध्या महाराष्ट्रात लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत सरकारणे मागे घोषणा केली होती . आता लाडली बहना योजना सुरू केल्यानंतर सरकारला त्याचा मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे.
लाडली बहना योजनायोजनेचे स्वरुप
1. लाडली बहना या योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये देण्यात येणार
2. या योजनेसाठी 21 वर्षे ते 60 वयोगटातील प्रवर्ग, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, विधवा अशा महिला अर्ज करू शकतात.
मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण शिवराज सिंह चौहान यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या लाडली बहना या योजनेअंतर्गत आजपर्यंत 1 कोटी 31 लाखांहून अधिक महिला लाभार्थ्यांनी भाग घेतला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच योजनेमुळे मध्यप्रदेशात भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे असा मतप्रवाह आहे. आता भाजपची हीच रणनीती वापरून शिंदे सरकार देखील महाराष्ट्र राज्यात लाडली बहना योजना राबवण्याचा विचार करत आहे. अद्यापही लाडली बहना योजना कशा पद्धतीने राबवण्यात येणार यासाठी किती कोटींची तरतूद केली जाईल याबाबतची माहिती समोर आलेली नाही. म्हणजेच शासननिर्णय आलेला नाही.