मला लहानपनापासुनच पर्यटनाची आवड कुठेतरी भंटकती करावी असे मला नेहमी वाटत राहायचे.आणि महाराष्ट्रात मला कोकण नी खुप वेड लावले .मी कोकणात अनेकदा गेलेली आहे.याच कोकणातील मला आवडलेले ठिकाण म्हणजे गणपतीपुळे .या ठिकाणी मी प्रथम माझ्या विदयार्थ्याची सहल घेउन गेले.लग्नानंतर कुठे जायचे तर गणपतीपुळेच असे म्हणुन मी गणपतीपुळेला गेले.तसेच अनेकदा सहकुंटब,मित्रपरिवार सह गणपतीपुळे ला गेलेले आहे. हे ठिकाण मला अतिशय आवडते.
गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेले एक छोटे शहर आहे, जिथे सुंदर असा समुद्रकिनारा आहे.तसेच त्याच समुद्रकिनारा वरती 400 वर्ष झालेले स्वयंभु असे गणेशमंदिर आहे. आध्यात्मिक प्रवासासाठी हे छोटेसे शहर पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. येथे महाराष्ट्रातील व गुजरात राज्यातील अनेक पर्यटक आपल्या व्यस्त दैनंदिन दिवसापासुन थोडासा वेळ आणि शहराच्या गजबजाटातून दुर म्हणुन आपल्या कुटुंबासह, मित्रमैत्रिणींसोबत नैसर्गिक सौंदर्याच्या आस्वाद घेन्यासाठी येथे येत असतात.
गणपतीपुळे मंदिर
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील टेकडीच्या अगदी खाली हे मंदिर आहे. गणपतीची मूर्ती पश्चिम दिशेला आहे. अशा मूर्तींना पश्चिम द्वारदेवता म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या इतिहासानुसार हे मंदिर ४०० वर्षे जुने आणि स्वयंभु आहे. असे म्हटले जाते की मूळ मंदिर प्रथम बाळ भटजी भिडे यांनी बांधले होते. काही वर्षानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराची पुनर्बांधणी केली आणि नंतर नानासाहेब, रमाबाई आणि माधवराव पेशवे या पेशव्यांनी या मंदिराचे सुशोभीकरण केले. या स्थानाचे वैशिष्टय इथल्या असीम स्रष्टीसौदर्यांत दडलेले आहे. अथांग असा अरबी समुद्र.समुद्राच्या लाटांशी खेळत असलेली लांबसडक पुळण.मंदिराला गर्द हिरवी पार्ष्वभूमी देणारी डोंगराची रांग आणि या हिरवळीला कोंदन लाभांव असं नव्या मंदिराच देखन स्थापत्य देखण्याजोग आहे.
गणपतीपुळेच्या भेटी दरम्यान जेव्हाही तुम्ही स्वयंभू गणपती मंदिराला भेट देता, तेव्हा तुम्ही दररोज सकाळी संध्याकाळी पूजेला उपस्थित राहून श्री चे आशीर्वाद मिळवू शकता, या दरम्यान संपूर्ण परिसर ढोलताशाच्या मंत्रमुग्ध सुरांनी गजबजते. आणि आपनास येथे येण्याचे समाधान सुध्दा मिळते.
Ganapatipule Beach गणपतीपुळे बीच
सहयाद्रीच्या रांगामधील हिरवीगार वनराई व स्वच्छ सुंदर रुपेरी वाळुचा समुद्रकिनारा ३ किलोमीटरमध्ये पसरलेला असून तेथे नारळ,काजु पोफळी हिरवीगार झाडे मोठ्या प्रमाणात आहे. कोकणातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनारा म्हणून याची ओळख आहे. समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. हा समुद्र किनारा उन्हाळा आणि हिवाळ्यात अनेक पर्यटकांना आकर्षित करित असते. समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्टसच्या विविध सुविधा आहेत. तिथल्या स्थानिक लोकांकडून कोकणी काजू, आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेता येते. थंड हवा, उसळत्या लाटा, स्वच्छ पाणी आणि मऊ सोनेरी वाळूचा जेव्हा पायाला स्पर्श होतो तेव्हा मन वेगळयाच आंनदाने हर्षुन जाते.म्हणुनच एकदा जीवनात प्रत्येकांनी येथे अवश्य भेट दयावी.
Malgund Ganpatipule मालगुंड गणपतीपुळे
मालगुंड हे गणपतीपुळे जवळील एक छोटे गाव आहे जे गणपतीपुळे मध्ये पाहण्यासारखे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मालगुंड हे प्रसिद्ध मराठी कवी कवी केशवसुत यांचे वडिलोपार्जित गाव आहे. कवीचे घर, आता विद्यार्थी वसतिगृहात रूपांतरित झाले आहे. गावात मराठी साहित्य परिषदेने बांधलेल्या कवीचे स्मारक देखील आहे जिथे आपण त्याच्या सन्मानार्थ श्रद्धांजली वाहू शकता.
कोकण संग्रहालय
गणपतीपुळे बसस्थानकापासून ६०० मीटर आणि गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यापासून १ किमी अंतरावर प्राचीन कोकण एक खुले संग्रहालय आहे. कोकणी जीवनशैली दर्शविणारी येथे अनेक प्रदर्शने आहेत. जर तुमचा दोन दिवसांचा मुक्काम असेल तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. येथे प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती ४० रुपये शुल्क भरावे लागते. आणि वेळ सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते.
प्राचीन कोकण हे पाचशे वर्षांपूर्वीच्या कोकणाच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या एका मोठ्या संकुलात उभारण्यात आलेले एक संग्रहालय आहे. या संग्रहालयात कोकणातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. यामध्ये ग्रामदेवलाय (गावाचे मुख्य मंदिर), ग्रामप्रमुख खोत (गावप्रमुख), कोकणातील शासक व्यवसाय आणि वेशभूषा यांचा समावेश आहे.
प्राचीन कोकणात 150 विविध प्रकारची झाडे आहेत. यामध्ये गोल्डन शॉवर ट्री (बहावा), चिरोंजी (चारोली), चंदन आणि इतर अनेक दुर्मिळ प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे . कोकणातील घनदाट आणि समृद्ध जंगलात आढळणारी ब्लॅक पँथर, वाघ, बिबट्या, पॅंगोलिन आदींची शिल्पे संग्रहालयात आहेत.
या प्रदर्शनातून कोकणातील स्थानिक स्थळे, स्थानिक व्यवसाय, स्थानिक कला आणि सणांची माहिती मिळते.
गणपतीपुळे ला भेट देण्याची योग्य वेळ
गणपतीपुळे येथे जाण्याचा उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिना असतो. हा असा काळ आहे जेव्हा आपण इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेऊ शकतो.शक्यतो पावसाळयात येथे जाण्याचे टाळा कारण पावसाळयात कधी कधी समुद्रकिणा-या वरती आपणास जाण्यास परवानगी दिली जात नाही. कारण समुद्र खवळलेलेा असतो .
Ganpatipule accommodation गणपतीपुळे ला कुठे
राहणार
श्री क्षेत्र संस्थान गणपतीपुळे यांचे अतिशय सुंदर व माफक दरात भक्तनिवास गणपतीपुळे येथे आहे. भक्तनिवासाचा परिसर अतिशय रमनिय व आल्हादायक आहे. तिथे पिण्याचे स्वच्छ पाणि ,चहा ,कॉफी ,नास्ता व भोजनाची सुध्दा सुविधा आहे.आपन येथे मुक्कामाने राहु शकता.तसेच कोकणी होम स्टे,हॉटेल येथे सुध्दा तुम्ही राहु शकता .तसेच कोकणी जेवनाचा आनंद सुध्दा तुम्हाला घेता येणार.
How to reach Ganpatipule कसे पोहचाल
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आणि पुणे विमानतळ व कोल्हापुर विमाणतळ हे गणपतीपुळेचे जवळचे विमानतळ आहेत जे गणपतीपुळेपासून अंदाजे 352 आणि 335 किलोमीटर अंतरावर आहेत. एकदा तुम्ही विमानाने प्रवास केल्यानंतर मुंबई किंवा पुणे व कोल्हापुर विमानतळावर पोहचल्यावर, तुम्ही विमानतळावरून गणपतीपुळे पर्यंत टॅक्सी भाड्याने घेऊ शकता किंवा या मार्गावर वारंवार जाणारी बस ने जाउु शकता.
रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे गणपतीपुळेचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे जे गणपतीपुळेपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. हे रेल्वे स्टेशन पुणे, मुंबई, सोलापूर, गोवा, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर सारख्या भारतातील बहुतेक प्रमुख शहरांशी प्रामुख्याने जोडलेले आहे.
श्री क्षेत्र गणपतीपुळे हे रत्नागिरी रेल्वे स्थानकापासुन निवळीमार्गे 45 कि.मी.व नेवरे मार्गे सागरी महामार्गाने 25 कि.मी .तर मुंबई गोवा राष्ट़ीय महामार्गावरीत निवळी फाटयापासुन 32 कि.मी .अंतरावरती आहे.आरेवारे मार्गे सुध्दा आपण गणपतीपुळे ला जाउु शकता. रत्नागिरी बसस्थानकातून दर एक तासाने गणपतीपुळेसाठी बस रवाना होतात.