इथेनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे जे पेट्रोलमध्ये मिसळले जाऊ शकते आणि अनेक प्रकारच्या वाहनांमध्ये इंधन म्हणून वापरले जाऊ शकते. इथेनॉल प्रामुख्याने ऊसा पासून तयार केले जाते याचा फायदा शेती आणि पर्यावरणाला होतो.
पर्यावरणाला प्रदूषणापासून संरक्षित करण्याकरिता अनेक महत्वाची पावले उचलली जात आहेत, कारण पर्यावरण सुरक्षित ठेवण्याची गरज उत्तोरोत्तर वाढत आहे. प्रदूषण मुळे पृथ्वीचा समतोल बिघडत आहे, ज्यामुळे भविष्यात प्रदूषण मुळे मानव जातीला धोका निर्माण होऊ शकतो. हेच धोके ओळखून सरकार, संस्था आणि व्यक्ती प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहेत. स्वच्छ व मुबलक ऊर्जेचा अवलंब करणे हे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. नवीकरणीय ऊर्जेला आपण सामान्य भाषेत अक्षय ऊर्जा म्हणत असतो. अक्ष्य उर्जा जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करते आणि हानिकारक उत्सर्जन म्हणजेच कार्बन डायऑक्साइड कमी करण्यात मदत करते.
जगभरातील प्रत्येक सरकारे अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करीत आहेत, अक्षय ऊर्जा वापरास प्रोत्साहन देत आहेत आणि कार्बन उत्सर्जनावर कठोर नियम लावत आहेत. अशा परिस्थितीत भारताकडूनही अनेक प्रयत्न केले जात आहेत. आधी इलेक्ट्रिक वाहने आणि आता वाहने चालवण्यासाठी इथेनॉलचा वापर केला जात आहे. इथेनॉल हे पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत इथेनॉल कसे बनते आणि त्यात उसाचे योगदान कसे असते ते जाणून घेऊया.
Ethanol इथेनॉल काय आहे?
इथेनॉल हे एक प्रकारचा इंधन आहे, ज्याचा वापर वाहने चालवण्यासाठी केला जातो. इथेनॉल चा वापर करून वाहने चालवता येणार आणि प्रदुषण कमी होणार इथेनॉल, ज्याला इथाइल अल्कोहोल किंवा ग्रेन अल्कोहोल असेही म्हणतात. इंधन म्हणून वापरता येणारे जैवइंधन तयार करण्यासाठी इथेनॉल अनेकदा गॅसोलीनमध्ये मिसळले जाते. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या काही वाहनांमध्ये. इथेनॉलला अक्षय ऊर्जा म्हणून पाहिले जात आहे. इथेनॉल कॉर्न, ऊस किंवा सेल्युलोसिक बायोमास यांसारख्या कृषी पिकांपासून तयार केले जाऊ शकते.
Ethanol इथेनॉल कसे बनविले जाते?
इथेनॉल ऊस पिकापासून तयार केले जाते परंतु ते इतर पिकांपासून देखील तयार केले जाऊ शकते. याचा फायदा शेती आणि पर्यावरणाला होत असतो. इथेनॉल, पेट्रोलला चांगला पर्याय आहे. याचा वापर इंधनाला पर्याय म्हणून केला जातो आणि खर्चाच्या दृष्टीनेही स्वस्त आहे. हे देशांतर्गत तयार केले जानारे इंधन आहे ज्याच्या वापरामुळे कच्च्या तेलाची आयात करण्याची आवश्यकता असणार नाही आणि इथेनॉलची विशिष्ट टक्केवारी पेट्रोलमध्ये मिसळली जाऊ शकते. एकदा इथेनॉल तयार झाल्यानंतर, ते E10 (10% इथेनॉल असलेले) किंवा E85 (85% इथेनॉल असलेले) म्हणून ओळखले जाणारे जैवइंधन बनवण्यासाठी ते गॅसोलीनशी एकत्र केले जाऊ शकते. फ्लेक्स इंधन तंत्रज्ञानासह सुसज्ज वाहने E85 वर धावू शकतात.
फ्लेक्स इंधन तंत्रज्ञान काय आहे
पेट्रोल-डिझेलला महत्वाचा पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधनाकडे पाहिले जात आहे. म्हणूनच त्याला पर्यायी इंधन असे सुध्दा म्हणतात. हे पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केले जाते. यालाच अल्कोहोल-आधारित इंधन असेही म्हणतात कारण त्यात इथेनॉल वापरले जाते, जे शेतातील ऊस, मका या पिकांपासून तयार केले जाते. तसेच फ्लेक्स इंधन तंत्रज्ञान, ज्याला लवचिक इंधन तंत्रज्ञान किंवा FFV (लवचिक इंधन वाहन) तंत्रज्ञान असेही म्हणतात. फ्लेक्स इंधन वाहने विविध इथेनॉल-गॅसोलीन मिश्रणासह चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
Ethanol इथेनॉल उत्पादनात उसाची महत्त्वाची आहे.
इथेनॉल उत्पादनात ऊस महत्त्वाची भूमिका बजावते कारण ते इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणार्या प्राथमिक कृषी उत्पादनांपैकी एक आहे. उसामध्ये सुक्रोज मोठया प्रमाणात असते, ज्याचा उपयोग इथेनॉल उत्पादनासाठी एक आदर्श कच्चा माल म्हणुन वापरल्या जाते. उसापासून साखर मिलिंग आणि गाळप प्रक्रियेद्वारे काढली जाते .उसाचा रस इथेनॉलमध्ये रूपांतरित करण्यासाठी फीडस्टॉक म्हणून वापरला जातो. उसापासून इथेनॉल उत्पादन हे अत्यंत मौल्यवान आणि जैव उत्पादन आहे. उसाचा रस काढल्यानंतर उरलेला तंतुमय कचरा इथेनॉल उत्पादन प्रक्रियेसाठी वीज आणि वाफ निर्माण करण्यासाठी बायोमास इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो.
Ethanol इथेनॉल उत्पादनातून शेतकऱ्यांना उपयोग
इथेनॉलच्या वाढत्या वापराचा फायदा शेतकऱ्यांना होतो. इथेनॉल उत्पादनामुळे मका, ऊस आणि इतर बायोमास यांसारख्या फीडस्टॉक म्हणून वापरल्या जाणार्या कृषी पिकांसाठी बाजारपेठेत लक्षणीय मागणी निर्माण होते. या वाढलेल्या मागणीमुळे ही पिके घेणार्या शेतकर्यांच्या मालाच्या किंमती वाढू शकतात आणि बाजारात स्थिरता येऊ शकते. जे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध करून देते आणि त्यांचे उत्पन्न वाढवते.
Ethanol इथेनॉल बंदिमुळे साखर कारखान्यांवरती परिणाम
देशातील संभाव्य साखर संकट टाळण्यासाठी इथेनॉल निमिर्ती वरती केंद्र सरकारणे अचानक घातलेल्या बंदिमुळे साखर उदयोगावर मोठे संकट उभे राहले आहे.देशातील सुमारे 325 प्रकल्प चालवणाऱ्या कारखान्यांसाठी अडचणीचा ठरणार आहे. राज्यातील साखर उत्पादक मोठया प्रमाणावर इथेनॉल निर्मितकडे वळला आहे. कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्पासाठी मोठी कर्जे घेतली आहे..