अमेरिकेतील प्रसिध्द कंपनी टेस्ला प्रमुख इलॉन मस्क रविवारला भारतात येणार आहेत.व सोमवार ला ते भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर भारत सरकारने नवी दिल्ली येथे स्पेस स्टार्टअप्ससह आयोजित केलेल्या कार्यक्रमात मस्क उपस्थित राहण्याची शक्यता आहे, सध्या भारताकडे अनेक देश गुंतवणुकी करीता तयार आहेत त्यात मग इलॉन मस्क मागे कसे राहणार.तसेही एका वृत्तवाहिनी ला दिलेल्या इंटरव्युह मध्ये मा नरेंद्र मोदी यांनी म्हटलेच होते की,भारतात कोणीही येउन गुंतवणुक करु शकणार फक्त त्या कंपनी करिता श्रम आमचे असले पाहिजे.उत्पादित वस्तुंना भारतीय मातीचा सुंगध असला पाहिजे.आमच्या देशातील नवयुवकांना रोजगार मिळाला पाहिजे.
म्हणुच इलॉन मस्कचे च्या आगमनाने भारतीय EV कार उत्पादनावर एक वेगळा परिणाम होणार .तरी थोडक्यात काही मुददे येथे महत्वाचे आहेत.
आयात कर कमी
स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या धोरणामुळे भारतात आयातीवर जास्त कर आहे. याला आयात प्रतिस्थापन औद्योगिकीकरण (ISI) असे म्हणतात. उच्च आयात शुल्क हे या धोरणाचा परिणाम आहे, जे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये आवश्यक सुध्दा आहे. उद्योगांना आंतरराष्ट्रीय व्यापारापासून संरक्षित करण्यारिता हे महत्वाचे सुध्दा आहे.
अनेक वर्षांपासून, इलॉन मस्कने ईव्हीसाठी भारतातील उच्च आयात करांना विरोध केला आणि ते बदलण्या साठी प्रयत्न केले. भारताच्या सरकारने मार्चमध्ये नवीन EV धोरणाचे अनावरण केले ज्यामध्ये कोणत्याही कार निर्मात्याने किमान $500 दशलक्ष गुंतवणूक केल्यास आणि कारखान्याचा प्रकल्प् सुरू केल्यास काही मॉडेल्सवर आयात कर 100% वरून 15% पर्यंत कमी केला. मग आता याचा परिणाम असा झाला की इलॉन मस्क भारतीय गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहे.
भारतातील ईव्ही बाजारपेठ
तसे पाहता भारत इलेक्ट्रिक कारचा बाबतीत बाल्यावस्थेत आहे.भारतामध्ये अजुनही इलेक्ट्रिक कार चा बाबतीत पाहिजे तेवढा प्रतिसाद नाही.आणि इलेक्ट्रिक कारचा बाबतीत टाटा मोटर्स चे वर्चस्व आहे. 2023 मध्ये एकूण कार विक्रीच्या केवळ 2% EVs होत्या, परंतु सरकारने 2030 पासून 30% नवीन कार EVs बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
इलेक्ट्रिक कारसोबतच त्याला लागणारे पुरक घटक निर्मात्यांच्या बाबततीत गुंतवणुकीचा एक रोडमॅप सुध्दा येऊ शकतो. बॅटरी उत्पादन क्षेत्रातीत गुंतवणूक हा देखील गुंतवणुकीचा एक भाग असू शकतो,
रोजगाराचा संधी
इलॉन मस्क भारतात येणार नविन गुंतवणुक प्रकल्प आणणार ज्यामुळे भारतातील नवयुवकांना रोजगाराच्या सुध्दा नविन संधी मिळणार. टेस्ला मालक भारतातील त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम कीती हे उघड करू शकतात, परंतु ही गुंतवणूक किती काळासाठी आणि देशाच्या कोणत्या राज्यात होणार आहे हे अद्याप उघड कळू शकले नाही .
EV चा पर्यावरणावर परिणाम
पारंपारिक गॅसोलीनवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत EV कार चा पर्यावरणावर होणारा प्रभाव सामान्यतः सकारात्मक म्हणून पाहिला जातो. इलेक्ट्रिक वाहने शून्य टेलपाइप उत्सर्जन करतात, ज्यामुळे वायू प्रदूषण आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी होते. तथापि, बॅटरीसह इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनामुळे संसाधने वाढणे आणि ऊर्जा वापर यासारखे पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात.