अंडे हे एक पौष्टिक अन्न आहे जे निरोगी आहाराचा भाग असू शकते .अंडयामध्ये उच्च प्रथिने असतात ज्यामुळे आपले वजन कमी करण्यास ते मदत करतात. अंडे मध्ये प्रथिनांव्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, बी, डी, ई, के, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम अशी अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजेदेखील मुबलक प्रमाणात आढळतात. अनेकदा असे दिसून येते की काही लोकांना संपूर्ण अंडी खाणे आवडते, तर काही फक्त अंड्याचा पांढरा भाग खातात. परंतु वजन कमी करण्यासाठी संपूर्ण अंडी खावी की फक्त त्याचा पांढरा भाग,हा अनेकांना प्रश्न पडतो.
अंड्याचा पांढरा भाग किंवा संपूर्ण अंडे काय खावे
आहारतज्ञ असे म्हणतात की, जर तुम्ही तुमचे वजन वेगाने कमी करण्याच्या दिशेने काम करत असाल तर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भागच खावा .कारण की त्यामुळे आपल्या शरीरात कमी कॅलरी जानार. जेव्हा तुम्ही संपूर्ण अंडे खाता तेव्हा त्यातून तुम्हाला अधिक प्रथिने मिळतात आणि त्यासोबतच कॅलरीज आणि फॅटही शरीरात पोहोचते. एक संपूर्ण अंडे 5 ग्रॅम प्रथिने आणि 60 कॅलरी देते. यासोबतच काही फॅट देखील मिळते. त्याचबरोबर अंड्याचा पांढरा भाग खाल्ल्यास त्यात थोड्या प्रमाणात प्रथिने असू शकतात आणि कॅलरीही कमी मिळतात. त्यात अजिबात चरबी नसते. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये फक्त 3 ग्रॅम प्रथिने आणि 20 कॅलरी असतात. तथापि, त्यात इतर आवश्यक पोषक घटक कमी असतात.
अंडे कधी खायचे
संडे हो या मंडे रोज खाये अंडे असे म्हणत काही लोक रोज अंडे खातात.तसे पाहले तर रोज अंडे खाल्यानेच फायदे मिळतात.अंडे हे नाशता मध्ये व जेवनात सुध्दा वापरु शकता.
अंडे कोणत्या स्वरुपात खाता येणार
उकडलेली अंडे:
उकडलेली अंडे हा एक अतिशय सहज सोपा आणि सोयीस्कर पर्याय आहे. उकळलेल्या अंडयामध्ये कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात, जे आपल्याला जास्त काळ परिपूर्ण ठेवण्यास मदत करते आणि एकूणच कॅलरीचे प्रमाण कमी करते. तर आपण रोजच्या नाशत्यामध्ये उकळलेले अंडे वापरु शकता.
अंडा भुर्जी :
पालक, मेथी, टोमॅटो सारख्या विविध छान हिरव्या भाज्या मध्ये आपण अंडे घालुन अंडाभुर्जी बनवुन सेवन करु शकतो.त्यात हिरवी कोंथीबीर टाकुण एक चवदार स्वरुपात खाउु शकतो. हे केवळ चव वाढवत नाही तर फायबर आणि पोषक द्रव्ये देखील आपल्या शरिराला पुरविते.ज्यामुळे आपले जेवण अधिक समाधानकारक होते.
ऑमलेट:
अंड्याचा पांढरा भाग किंवा संपूर्ण अंडी आणि अंड्याच्या पांढऱ्या भागाचे मिश्रण असलेले ऑमलेट तयार करा.
अंडी कोशिंबीर:
अंडी चे दोन काप करुन त्यावरती कोशिंबीर , अजवाइन, कांदा आणि मिरपूड टाकुण सुध्दा त्याचे सेवन करु शकता.
अंडा पराठा:
उकडलेली अंडी छान त्याचा कीस करुन पीठा मध्ये मिसळुण तुम्ही पराठा बनवुन त्याचे सेवन करा अतिशय पौष्टिक पराठा तयार होणार.
अंडा करी:
आपण अंडयाची भाजी करुन सुध्दा त्याची अंडा करी म्हणुन जेवनात वापरु शकता.
डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधोपचार किंवा उपचारांना पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.