फार पुर्वीपासुनच मातीची भांडी घरात वापरणे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र सध्याचे डिजिटल युगात ही भांडी जवळपास सर्वच घरांमधून गायब झाली असल्याचे आपणास दिसते आहे.गावात पूर्वी मातीच्या मडक्यात अन्न शिजवलं जात होतं, त्या शिजवल्या जाणाऱ्या मडक्याला ‘हंडी’ असं म्हणत असतं. आता फक्त हॉटेलमध्ये हंडी चिकण खाण्यापुरते मातीच्या भांड्यांचे नाव लक्षात राहले .तसेच मातीचे भांडे वापरण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.कारण मातीच्या
भांड्यांची जागा आता अद्ययावत स्टील, तांबे किंवा अॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली आहे. परंतु मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे आपणास जानुन घेणे आवश्यक आहे.
मातीची भांडी आणि अन्नाची चव
मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न मातीच्या अल्कधर्मी स्वभावामुळे चवीला खूप वेगळे लागते .तुम्ही त्यात साधा भात सुध्दा बनविणार तरी तो भात अतिशय चवदार लागतो. चहा,दुध ताक याकरीता सुध्दा तुम्ही मातीच्या भांडयाचा उपयोग करु शकता.मातीच्या भांडयातुन तुम्हाला लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मिळतात.
मातीची भांडी आणि अन्नाचे पोषण
मातीच्या भांड्यांना लहान, न दिसणारी छिद्रे असतात आणि अन्न शिजवताना ते उष्णता आणि ओलावा समानतेने वितरित करतात. त्यामुळेच अन्नाचे पोषणतत्वे टिकुण राहते.
मातीची भांडी आणि सुंगध
मातीच्या भांड्यांमध्ये असलेले क्षाराचे स्वरूप तुमच्या अन्नात असलेल्या अॅसिडवर प्रतिक्रिया करते आणि त्याचे pH संतुलन राखते. त्यामुळेच मातीच्या भांडयातील अन्नाला एक वेगळा छान सुंगध असतो.आणि ते अन्न अधिक आरोग्यदायी आणि चविष्ट बनते.
मातीची भांडी आणि तेल कमी
मातीच्या भांडयामध्ये एखादा पदार्थ शिजवताना तेल कमी वापरले जाते. कारण ते अन्नामध्ये नैसर्गिक तेल आणि ओलावा टिकवून ठेवते.त्यामुळेच अशा भांडयामध्ये शिजवलेले अन्न हृदयासाठी सर्वोत्तम आहे.
मातीची भांडी आणि वेळेची बचत
तांबे , अॅल्युमिनियमच्या कींवा स्टीलच्या भांड्यांच्या तुलनेत मातीच्या भांडयात अन्न शिजवण्यास कमी वेळ लागतो.खुप कमी गॅस चा वापरात आपले अन्न् शिजवुण तयार हेाते.
मातीची भांडी आणि पैस्याची बचत
मातीची भांडी आपल्या देशात सहज उपलब्ध होतात.ते बाकीच्या भांडयापेक्षा स्वस्त सुध्दा असतात.त्यामुळे त्यांच्या वापरामुळे आपलया पैश्याची बचत सुध्दा होणार.आणि त्याचा जर आपण वापर वाढविल्यास आपल्या भारतीय ग्रामिण भागातील शेतक-यांचे उत्पन वाढविण्यास मदत सुध्दा होणार.