Saturday, July 27, 2024
spot_img
HomeFOODChakli कुरकुरीत आणि चवदार चकली

Chakli कुरकुरीत आणि चवदार चकली

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली  आहे. दिवाळीच्या फराळ मधली  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चकली. पण  ही चकली बनवणे  अनेक महिलांना मोठं संकट जाणवतं.  चकली म्हटले तर त्याला चांगले काटे असावेत, तसेच ती कुरकुरीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे अशी कुरकुरीत चकली बनवण्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे.

चकलीसाठी साहित्य

  1. अर्धा किलो तांदूळ
  2. २०० ग्रॅम हरबरा डाळ
  3. १०० ग्रॅम मूगडाळ
  4. ५.५० ग्रॅम उडीद डाळ
  5. ६.५० ग्रॅम पोहे
  6. ७. ५० ग्रॅम साबुदाणा,
  7. ८. १० ग्रॅम धने
  8. ९. १० ग्रॅम जिरे
  9. 10 एक वाटी तीळ
  10.   तेल 

     

     

    चकलीची भाजणी

    1.प्रथम स्वच्छ तांदूळ दोनदा धुवून काढावे.आणि त्यानंतर ते सुती कापडावरती वाळत घालणे.

    २. सर्व वाळलेले तांदूळ गरम कढईत  मध्यम आचेवर भाजून घ्यावेत, त्यानंतर सर्व डाळी मध्यम आचेवर भाजून घ्याव्यात. जिरे थोडे हलके भाजून घ्या.

    ३. सर्व भाजलेले दाणे एकत्र करून थंड होऊ द्या, नंतर सर्व मिश्रण मिक्सरमध्ये किंवा पीठ गीरणी वरती दळण करुन आणने.

    चकलीची पीठ कसे भिजवावे

    १. चकलीच्या पिठात २ चमचे गरम  तेल घालावे.

    १. चकलीपीठ भिजवण्यासाठी भांड्यात गरम पाणी तयार करावे आणि गरम पाण्याने पीठ भिजवावे.

    २. चकलीपीठ भिजवताना एक वाटी तीळ, १ चमचा लाल तिखट, १ चमचा हळद, चवीनुसार मीठ  टाकुण पीठ भिजवायचे व ते थोडा वेळ झाकून ठेवावे.

    चकली तळण्याची पद्धत- 

    १. चकली साच्याच्या साहाय्याने गोल चकली तयार करून मंद ते मध्यम आचेवर तळून घ्या.

    २. जेव्हा त्याच्या भोवतालचे तेलाचे बुडबुडे कमी होतात आणि ते  खाली बसू लागतात तेव्हा ते नीट तळलेले आहे हे समजून घ्यावे.

    ३.  तळल्यानंतर चकली लगेच डब्यात ठेवायची नाही ती थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवायची.

    अशाप्रकारे तुम्हीही क्रिस्पी चकली बनवुन पहा,

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page