Saturday, July 27, 2024
spot_img
HomeFOODBESAN LADU बेसन लाडु

BESAN LADU बेसन लाडु

भारतात अनेक सण उत्सव साजरे केले जातात.आणि प्रत्येक सनाला काहितरी गोड पदार्थ केले जातात.आणि दिवाळी तर हमखास बेसन लाडु आवर्जुन केले जातात तर चला बेसन लाडु कसे तयार करतात या बाबत माहिती घेवुया

BESAN LADU बेसन लाडु करिता साहित्य:

  1. दिड कप बेसन
  2. साधारण पाऊण कप तूप
  3. ३/४ कप पिठी साखर (किंवा गरजेनुसार)
  4. १/२ टिस्पून वेलचीपूड
    5. ३ टेस्पून दूध
    6.   बेदाणे किंवा सुकामेव्याचे तुकडे आवडीनुसार

BESAN LADU  बेसन लाडु

 BESAN LADU बेसन लाडु कृती

  1. काढई किवां पॅन मध्ये पाऊण कप तूप साजूक तूप टाकून घ्या. साजूक तूप नसेल तर डालडा पण वापरू शकता.

२. नंतर यामध्ये दीड (१.५) कप बेसन घ्यावे .

 

३. त्यानंतर हे मिश्रण गॅस वर ठेवा आणि मंद आचेवर भाजून घेण्यात यावे. हे मिश्रण भाजत असताना हे मिश्रण हलवत राहा जेणे करून ते काढई किवां पॅन ला चिकटणार नाही.

 

  1. हे बेसन चे मिश्रण लालसर रंग येईपर्यंत भाजा. १० मिनिट भाजल्यानंतर हा रंग येईल.

 

  1. बेसनाचा रंग लाल झाल्यवर गॅस बंद करा आणि त्यामध्ये वेलची थेाडी पूड टाका आणि त्यानंतर तुमच्या आवडी नुसार काजू,बदाम चे काप टाका.

 

  1. आता हे मिश्रण चांगले मिसळा आणि बेसन थोडे थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.

 

  1. हे मिश्रण कोमाट झाल्यवर यात दोन कप पिठीसाखर घाला. हे प्रमाण तुमच्या आवडी नुसार कमी जास्त पण करू शकता.

 

  1. आत हे मिश्रण चांगले एकजीव करा आणि गोल आकाराचे लाडू बनवुन घ्या.

 

  1. आता हे वळलेले लाडु एका प्लेट मध्ये काढा आता हे लाडू खायला तयार आहेत.

 

10.हे बेसन लाडु अतिशय पौष्ठिक असतात.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page