APAAR: वन नेशन, वन स्टुडंट आयडी शालेय विद्यार्थ्यांसाठी
‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ योजनेअंतर्गत देशभरातील शालेय विदयार्थ्यांकरिता अपार क्रंमाक तयार केला जाणार आहे.त्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात राज्यांना संदेश पाठवला आहे. त्यामुळे आता शाळा ,शिक्षक,पालकामध्ये अपार क्रंमाक ची चर्चा होतांना दिसत आहे. तर चला आपण आज या लेखात अपार सदंर्भात माहिती घेउया.
What is Apaar Card : आधार कार्डानंतर आता विद्यार्थ्यांसाठी अपार कार्ड बनवण्याची तयारी सुरू आहे. ही कार्ड फक्त विद्यार्थ्यांसाठी असतील आणि त्यांची निर्मिती झाल्यानंतर त्यांना आयुष्यभर यातून अनेक फायदे मिळू शकतील. त्याची थीम वन नेशन, वन स्टुडंट आयडी म्हणजेच एका देशातील विद्यार्थ्यांसाठी फक्त एक प्रकारचा आयडी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात राज्यांना संदेश पाठवला आहे. याअंतर्गत पालकांच्या संमतीने शाळांद्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. जाणून घ्या नक्की काय आहे ही योजना
अपार क्रंमाक काय आहे ?
AAPAR म्हणजे ऑटोमोटेड परमानेंट अकेडमिक अकाउंट रजिस्ट्री. या अपार क्रंमाकदवारे विद्यार्थ्यांना विशेष क्रंमाक दिला जाणार.अपार क्रंमाकातुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती डिजिटल पध्दतीले साठविण्यात येणार.विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचालीवर देखरेख करता येणार. विद्यार्थ्यांचा निकाल, महाविद्यालय, शाळा, यश, सर्व काही एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासाची संपूर्ण नोंद असणार आहे.
अपार क्रंमाक तयार करण्यातील अडचण :
अपार क्रंमाक हा आधार कार्डवरुन तयार करण्यात येणाार आहे, परंतु राज्यातील अनेक विद्यार्थ्यांकडे अजुन सुध्दा आधार क्रंमाक नाही तसेच अनेक आधार कार्ड आणि स्टुंडट संकेतस्थळावरीत माहिती विसंगत आहे. आधार जोडणीचे काम अपुर्ण असल्याने अपार क्रंमाक निर्माण करण्यात अडचण येणार आहे.
अपार क्रंमाक आवश्यक आहे काय ?
अपार कार्ड तयार करण्यासाठी प्रथम पालकांची समंती आवश्यक आहे.तसे संमतीपत्र लिहुन घेणे प्रत्येक शाळेला अनविार्य केले आहे.एखादा पालक त्या संमती दिली नाही तर त्याचे पुढे काय परिणात होणार याबाबत माहिती शाळेने पालकांना दयावी.
अपार क्रंमाक वरुन विद्यार्थ्यांचा संपुर्ण शैक्षणिक आलेख एकाच क्रंमाक(कार्ड) वरुन मिळणार आहे.अपार क्रंमाकात विदयार्थ्यांची साठविलेली माहिती अन्य संस्थाना देतांना सोयिचे होणार.
तरी सुध्दा सदर अपार क्रंमाकवरील अंत्यत महत्वाची माहितीचा कोणी गैरवापर करणार तर नाही याबाबत पालंकामध्ये चिंता आहे.