Sunday, September 15, 2024
spot_img
HomeFOOD6 amazing healthy foods to eat everydayनिरोगी राहायचे आहे: आपल्या आहारात...

6 amazing healthy foods to eat everydayनिरोगी राहायचे आहे: आपल्या आहारात हे 6 पदार्थ आवश्यक आहे.

आपण निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करत असाल तर जंक फूड टाळा व पुरेसे पोषक आहाराची निवड करा.रोजच्या सामान्य जेवणातुन सुध्दा तुम्हाला आत्मीक समाधान मिळणार व शरीराचे सुध्दा पोषण होणार. दररोज खाण्यासाठी अनेक आरोग्यदायी पदार्थ आहेत ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले होऊ शकते.ज्याच्या सेवनाने कर्करोगापासुन मुक्ती ,रक्त तयार करणे व कोलेस्ट्रॉल पातळी कमी होउ शकते आणि आपले शरीर सुरळीत चालू राहु शकते.

चांगले जगणे म्हणजे योग्य खाणे आणि पुरेसे पोषकतत्वे  मिळणे. सामान्य जेवण समाधानकारक करण्यासाठी तुम्हाला विदेशी फळे, भाज्या किंवा नटांची  अजिबात गरज नाही.

तुमच्या आहारातून जास्तीत जास्त् पोषक तत्वे  मिळवण्यासाठी आणि तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही नियमितपणे  खालील विविध पदार्थ खावेत.

दलिया

गरम दलिया च्या सेवनाने आपल्या आरोग्याचे पोषण होते त्यात भरपुर प्रमाणात फायबर असते.
गरम दलिया च्या सेवनाने आपल्या आरोग्याचे पोषण होते त्यात भरपुर प्रमाणात फायबर असते.

दलिया हा आपण नाश्त्यामध्ये  व रोजच्या जेवनात सुध्दा वापरु शकतो.गरम गरम दलिया च्या सेवनाने आपल्या आरोग्याचे पोषण होते त्यात भरपुर प्रमाणात फायबर  असते. अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या मिक्स करुन आपण दलिया तयार करु शकतो. दलिया मध्ये  फायबरच नाही तर प्रथिनेदेखील खूप जास्त प्रमाणात असतात. हे खाल्ल्याने चयापचय वाढते आणि हार्मोन्स व्यवस्थित काम करण्यास सुरवात करतात. वजन कमी करण्यासाठी आपल्या स्नायूंना प्रथिनांची सर्वात जास्त गरज असते.

ब्रोकोली

प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने आपले आरोग्य निरोगी राहते.
प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने आपले आरोग्य निरोगी राहते.

बाजारात कोबीसारखी दिसणारी ब्रोकोली  ही खूप फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने  आपले आरोग्य निरोगी राहते. शाकाहारी लोकांसाठी हे अंड्याइतकेच प्रथिने देते. ब्रोकोली एक प्रकारची क्रूसिफेरस भाजी आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे सर्व कर्करोगास कारणीभूत पेशींचे नुकसान होण्यापासून रोखण्याचे काम करतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते, जे अँटीऑक्सिडेंट आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे  ते कार्य करते. ब्रोकेली चे  सेवन केल्याने हिवाळ्यात अनेक समस्या टाळता येतात आणि आजारांना दूर ठेवता येते.

अंडी

प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे.
प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे.

आपल्या कडे सहज उपलब्ध असणारी वस्तु म्हणजे अंडे . तुम्ही ते उकडलेले, तळलेले किंवा ऑम्लेट च्या स्वरुपात त्याचे सेवन करु शकता.

अंडे हे खरोखरच एक पुर्ण पौष्टिक पदार्थ आहे. त्याचे सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक चांगले फायदे होऊ शकतात. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी-१२, सेलेनियम इत्यादी पोषक घटकांचा समावेश आहे. त्याशिवाय अंड्यांमध्ये चांगले फॅट्स आणि अंटीऑक्सिडंट्स घटक आहेत; जे मेंदू आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात.

 बीन्स

हिरव्या बीन्स मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास दररोज कॅल्शियम मिळु शकते.
हिरव्या बीन्स मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते. आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास दररोज कॅल्शियम मिळु शकते.

हिरव्या बीन्स मध्ये   लोह भरपूर प्रमाणात असते. आहारात सोयाबीनचा समावेश केल्यास दररोज कॅल्शियम मिळु शकते. हाडे मजबूत करण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकतात. जवळपास सर्वच प्रकारचे बीन्स हाडांसाठी फायदेशीर असले तरी तुमच्याकडे कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्या आहारात मूग डाळ आणि सोयाबीनचा जरूर समावेश करा.

डार्क चॉकलेट

लोह, तांबे, फ्लॅव्हानॉल, झिंक आणि फॉस्फरस या सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.
लोह, तांबे, फ्लॅव्हानॉल, झिंक आणि फॉस्फरस या सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात.

तुमचे हृदय आनंदी ठेवायचे असेल तर डार्क चॉकलेट खा.  यात लोह, तांबे, फ्लॅव्हानॉल, झिंक आणि फॉस्फरस  या सारखे पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी  खूप फायदेशीर मानले जातात.

उच्च रक्तदाब, प्लेटलेट तयार होणे, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ यावरती डार्क चॉकलेट फायदेशिर आहे.

 दही

दहयाचे सेवन केल्याने हे बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस, पोटाची उष्णता इत्यादी टाळता येतात.
दहयाचे सेवन केल्याने हे बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस, पोटाची उष्णता इत्यादी टाळता येतात.

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला वाढण्यासाठी अमिनो अॅसिडची आवश्यकता असते, जी प्रथिनांमधून येते. आपले स्नायू, त्वचा, केस, नखे इत्यादी प्रथिनांनी बनलेले असतात. त्यामुळे दररोज प्रथिने घेणे गरजेचे आहे.  आणि हे प्रथिणे आपणास दहयातुन मिळतात.तसेच दहयाचे सेवन केल्याने हे  बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस, पोटाची उष्णता इत्यादी टाळता येतात.

दहयात कॅल्शियम ची मात्रा भरपुर प्रमाणात असते.आणि आपले हाडांच्या मजबुतीकरीता दही आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधोपचार किंवा उपचारांना पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page