Saturday, July 27, 2024
spot_img
HomeCURRENT AFFAIRSमॅथ्यू पेरी च्या मृत्यूचं कारण आले समोर

मॅथ्यू पेरी च्या मृत्यूचं कारण आले समोर

मॅथ्यू  लँगफोर्ड पेरी हे अमेरिकन आणि कॅनेडियन अभिनेता होते. नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय अमेरिकन टीव्ही शो ‘फ्रेंड्स मध्ये चँडलरची भूमिका साकारणारे ते  अभिनेते होते.त्यात त्यांना अतिशय  प्रसिद्धी मिळाली. पेरी अ‍ॅली मॅकबीलवर देखील दिसले आणि द वेस्ट विंग आणि द रॉन क्लार्क स्टोरी मधील कामगिरीसाठी प्राइमटाइम एमी पुरस्कार ने नामांकन त्यांना प्राप्त आहे.

अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे काहीच महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांचा मृतदेह  त्यांच्या राहत्या घरी आढळला. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लास वेगास येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह घरातील हॉट टबमध्ये बुडालेल्या अवस्थेत आढळून आलेला  होता. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून अजूनही अनेक चाहते यातून सावरलेले नाहीत.त्यातच नवीन बातमी अशी आली की, आता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय अहवाल शुक्रवारी समोर आला आहे. यात मॅथ्यूच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. केटामाईनच्या ओव्हर डोसमुळे त्यांचा  मृत्यू झाल्याचे असे सांगण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, मॅथ्यू  लँगफोर्ड पेरीच्या रक्तात  केटामाइनची पातळी जास्त होती.   डिप्रेशनमधून बाहेर पडण्याकरिता जे  उपचार घेतले जात असतात त्यादरम्यान या केटामाइन ड्रगचा सर्वाधिक वापर केला जातो असं सांगितलं जातं. याचाच अर्थ मॅथ्यू पेरी हे डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी उपचार घेत होते अन् त्यादरम्यान वापरण्यात आलेल्या काही ड्रगचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला अन् त्यामुळेच त्यांचा मृत्यू ओढवला असल्याचं आता स्पष्ट होत आहे.

spot_imgspot_img
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today Artical

Most Popular

You cannot copy content of this page