तांदुळ हा आपला आहारात महत्वाचा घटक आहे.परंतु आपल्यापैकी बरेच जण दररोज भात खाणे टाळतात कारण त्याचा संबंध वजन वाढण्याशी असतो म्हणुन. तांदळाच्या अनेक प्रजाती आहे.पांढरा तांदुळ, तपकिरी तांदुळ,काळा तांदुळ असे अनेक प्रकार आहेत.परंतु सहज उपलब्ध असणारा हा पांढरा तांदुळ आहे. भारतातील अनेक लोकांचे मुख्य अन्न पांढरा तांदूळ आहे. पांढरा तांदूळ आरोग्यासाठी चांगला नसतो, असे अनेकांचे मत आहे परंतु तसे नाही. पांढरा तांदूळ मध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फोलेट आणि व्हिटॅमिन बी 1 सारख्या आवश्यक पोषक तत्वे आहे, ज्यामुळे ते आपल्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. तर मग पांढऱ्या तांदळाचे आरोग्यदायी महत्व येथे पाहुया.
पांढऱ्या तांदळाचे आरोग्यविषयक फायदे:
1.सहज उपलब्धता:
पांढरा तांदूळ हा सर्व प्रदेशात सर्वत्र उपलब्ध होतो.तसेच तांदुळ पिकविण्यास सुध्दा खर्च कमी येतो.त्यामुळे तो सहज सगळीकडे उपलब्ध होतो.प्रत्येक आर्थिक परिस्थितीतील लोक तांदुळ अत्र म्हणुन खाऊ शकतात.तसेच प्रत्येक स्थानिक स्टोअरमध्ये पांढरा तांदूळ सहज उपलब्ध होतो. म्हणुनच पांढरा तांदुळ हा आपल्या आहारात असणे आवश्यक आहे.
2.ऊर्जा प्रदान करते:
पांढरा भात खाल्ल्याने झटपट ऊर्जा वाढते कारण त्यात कार्बोहायड्रेट्स असतात. कार्बोहायड्रेट्स हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. या साध्या कार्बोहायड्रेटमध्ये आवश्यक तंतू आणि चरबी समाविष्ट असतात ज्यामुळे तुमची उर्जा पातळी वाढण्यास मदत होते.यामुळेच क्रीडापटू किंवा व्यायाम करणाने लोक पांढरे तांदुळ खातात.
3.पचण्यास सोपे:
पांढरा भात हा पचायला अतिशय सोपा. भात शिजविल्यानंतर त्यात फायबरचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे गॅस्ट्रिक समस्या उद्भवू शकत नाहीत. ज्या लोकांना छातीत जळजळ किंवा मळमळ होत आहे त्यांना पांढरा भात खाण्याची शिफारस केली जाते.
4.पांढऱ्या तांदळात ग्लूटेन नसते:
ग्लूटेन हे एक प्रकारचे प्रथिन आहे, ज्यामध्ये अनेक घटक असतात. ग्लुटेनमध्ये असलेले ग्लियाडिन शरीरासाठी धोकादायक आहे. त्यामुळे शरीराला अनेक समस्या उदभवू शकतात.
भातामध्ये ग्लूटेन नसल्यामुळे तोंड, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा, वाढ, मोठे आतडे, लहान आतडे यासंबंधीचे अनेक आजार होत नाहीत.
5.कमी रक्तदाब:
पांढऱ्या तांदळात फॅट आणि कोलेस्ट्रॉल कमी असते, ज्यामुळे ते तुमच्या आहारात असायला पाहिजे.. तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी हे एक परिपूर्ण खाण्यायोग्य अत्र आहे.
ही माहिती विविध अभ्यासाच्या आधारे देण्यात आली आहे. कोणतेही अन्न सेवन करण्यापूर्वी, कृपया आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या