आज प्रत्येक व्यक्ती आपल्या ध्येया च्या मार्गाने जातांना जीवनात स्वत:कडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. पण आपलं आरोग्य सांभाळने ही तेवढेच महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्याच्या पंचसूत्री प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या पंचसूत्रीत समावेश होतो नियमित व्यायाम , उत्तम आहार, स्वच्छता ,करमणूक,आणि विश्रांती महत्वाची आहे .याबददल मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे ज्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहिल.
1 व्यायाम:
नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा पहिला मंत्र आहे. व्यायाम केल्याने आरोग्याचा दर्जा वाढतो. नियमित व्यायाम केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. नियमितपणे वेगाने चालणे, धावणे, योगीक व्यायाम, प्राणायाम, ध्यान, चिंतन अनेक आजारांना दूर ठेवतात. त्यामुळे सकाळी दिनचर्या सुरू करताना योग आणि प्राणायाम यापासून सुरू करावा.
2.आहार :
दैनंदिन जेवणात स्निग्ध पदार्थ, खनिज या घटक तत्त्वांनी युक्त सकस आणि संतुलित ताजा आहार व्यक्तीला मिळाल्यास आरोग्य चांगले राहते. तुमचा आहार जेवढा चांगला तेवढं तुमचं आरोग्य उत्तम.
3. स्वच्छता :
आहार घेतांना स्वच्छता बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. जेवन बनवतांना स्वच्छतेला अधिक प्राधान्य द्यावे. स्वच्छतेमुळे आरोग्याला पोषक स्थिती निर्माण होते. अस्वच्छतेमधून मलेरिया, गॅस्ट्रो यासारखे हानिकारक रोग उदभवतात. वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
4. करमणूक :
मनोरंजनातून व्यक्तीला आनंद मिळतो. मानसिक स्वास्थ लाभते. सुखी जीवनासाठी नेहमी आनंदी राहणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी करमणूकीच्या गोष्टी करा.प्रत्येकाला एखादा छंद असावा.
५. विश्रांती :
दिवसभरात विश्रांती तेवढीच महत्त्वाची आहे. आरोग्य आणि विश्रांती या दोघांचा सहसंबंध आहे. योग्यवेळी विश्रांती घेतल्याने तुम्ही उत्साही राहता. नियमित झोप ही तेवढीच महत्त्वाची आहे. शरीर जेव्हा थकते त्यावेळे योग्य विश्रांती घ्या.तुम्हाला नविन उर्जा मिळणार.