या विमा योजनेत जन्म आणि प्रसूतीच्या कोणत्याही गुंतागुंतीसह गर्भधारणेशी संबंधित संपुर्ण खर्च कव्हर केले जातील.
फूड ऑर्डरिंग आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ने Zomato बुधवारी आपल्या महिला डिलिव्हरी पार्टनर्ससाठी सर्वसमावेशक अशी मातृत्व विमा योजना (maternity insurance plan)सुरू करण्याची घोषणा केलेली आहे.ही महिलाकरिता अतिशय महत्वाची अशी योजना ठरणार आहे.खाजगी क्षेत्रात सुध्दा महिला करिता सुरक्षा योजना हे एक महत्वकांक्षी पाउल आहे.
या विमा योजनेत गर्भधारणेशी संबंधित जन्म आणि प्रसूतीच्या कोणत्याही गुंतागुंतीसह खर्च कव्हर केले जानार आहे.
योजनेतील अटी व शर्ती
- प्रसूती विमा संरक्षण ACKO चालविले जानार आहे.
- हि योजना अश्या महिला लार्भार्थ्यांना मिळणार ज्या महिलांनी Zomato प्लेटफॉर्म वरती 1000 डिलिव्हरी केलेली असेल
- मातृत्व विमा योजने अंतर्गत गेल्या 60 दिवसांपासून सक्रिय असलेल्या महिला डिलिव्हरी भागीदारांना याचा लाभ मिळणार आहे.
- मातृत्व विमा योजने या योजनेत केवळ दोन मुलांकरिताच सामान्य आणि सिझेरियन प्रसूती च्या वेळेस लाभ मिळणार.
- गर्भपात आणि गर्भपात यासारख्या प्रसूतीच्या गुंतागुंताीच्या वेळेस सुध्दा ही योजना कार्यान्व्यीत होईल.
- मातृत्व विमा योजना अंतर्गत सामान्य(नार्मल ) प्रसूती करिता 25,000 रुपयांपर्यंत ची मदत दिली जानार आहे.
- सिजेरियन झाले असल्यास के लिए 40,000 रुपयांपर्यंत ची मदत दिली जानार आहे.
- गर्भपात सारख्या गुंतागुंतीचया वेळेस 40,000 रुपयांपर्यंत ची मदत दिली जानार आहे.
Zomato फूड डिलिव्हरीचे सीईओ राकेश रंजन म्हणाले, ‘आमच्या संघटनेच्या रचनेत विविधता आणि सर्वसमावेशकता ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. आमची बांधिलकी सवोत्तम पातळीवरील पैलूंच्या पलीकडे जाते आणि आमच्या व्यवसायाच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि भागधारकांपर्यंत विस्तारते, ज्यात आमच्या वितरण भागीदारांचा समावेश आहे जे आमच्या दैनंदिन कामकाजात आवश्यक भूमिका बजावतात. महिला डिलिव्हरी पार्टनर केवळ भागीदारच नाहीत तर आमच्या सर्वसमावेशक धोरणे आणि उपक्रमांच्या लाभार्थी देखील आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही सतत काम करत आहोत.