हा लेख केवळ शासकीय कर्मचाऱ्याकरीता लिहीत नाही तर एक सामाजिक जानिवेतुन लिहित आहे.आज तुमच्या अवती भवती तसेच आपल्या नातेवाईक मध्ये अनाथ मुले असतील तर अश्या अनाथ मुलांना तुम्ही काही मदत जर करु शकत असाल तर तुमच्या जिवणाचे सार्थक होणार.
अनाथ मुलांना सर्वप्रथम खुल्या प्रवगातून शिक्षण मग ते कोणतेही शिक्षण असो(शैक्षणिक संस्था) व नोकरी यामध्ये 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्यात आले आहे.
अनाथ कोणाला म्हणायचे
सर्वात प्रथम आपण अनाथ् मुले कोणास म्हणु शकतो हे समजणे आवश्यक आहे.अनाथ करिता दोन व्याख्या आहे एक “संस्थात्मक” व दुसरी “संस्थाबाह्य”
1) “संस्थात्मक” या प्रवर्गामध्ये ज्यां मुला मुलींची वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडीलांचे निधन झाले आहे व ज्यांचे शासन मान्यता प्राप्त संस्थांमध्ये पालन पोषण म्हणजेच लहानाचे मोठे झाले आहे व त्यांच्या नातेवाईकाची अथवा जातीची माहिती उपलब्ध असेल किंवा नसेल अशा बालकांचा समावेश असेल.
2) “संस्थाबाह्य” या प्रवर्गामध्ये ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या आई वडीलांचे निधन झाले आहे आणि ज्यांचे शासन मान्यताप्राप्त संस्थांबाहेर कींवा कोणत्याही नातेवाईकाकडे संगोपन झालेले आहे अशा बालकांचा समावेश असेल.
पहा आज जरी मुलगा 25 वर्षाचा असणार तरी सुध्दा तो 18 वर्ष वय पुर्ण होण्याअगोदर त्याचे आई वडीलांचे निधन झाले असेल तर अश्या मुंलाना महाराष्ट शासनाच्या नौकरी मध्ये आरक्षण मिळु शकेल. त्या करिता त्याने खालील प्रमाणे प्रक्रीया केली पाहिजे.
आरक्षणाचे स्वरुप
1) अनाथ आरक्षणाची अमंलबजाणी ही दिव्याांग आरक्षणाच्या धर्तीवर करण्यात येईल.
2) सदर आरक्षण तसेच शैक्षणिक सांस्था व व्यावसायिक शिक्षण प्रवेशासाठी व शासकीय पदभरतीसाठी लागू राहील.
3) अनाथाांसाठी आरक्षित पदे ही पदभरतीसाठी उपलब्ध एकूण पदसंख्येच्या तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी उपलब्ध एकूण जागाांच्या 1% इतकी असतील.
4) त्यात पदाची विभागणी ही संस्थात्मक व संस्थाबाह्य या प्रवगांमध्ये करण्यात येईल
त्याकरीता महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दिंनाक 6 एप्रिल 2023 चा अभ्यास करावा.
अटी व शर्ती
1) आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराकडे महिला व बाल विकास विभागाचे अनाथ चे प्रमाणपत्र असणे आवश्यक असेल.
2)त्यााने महाराष्ट्र राज्याचा अधिवासी (Domicile) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.
3) त्याने संबधित पदाची शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
4) अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन शासन सेवेत रूजू होणाऱ्या उमेदवाराला अनाथ प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात ही नियुक्ती देण्यात येईल. नियुक्ती पश्चात 6 महिण्याच्या कालावधीत आयुक्त, महिला व बाल हवकास, पुणे याांचेकडून अनाथ प्रमाणपत्राची पडताळणी करुन घ्यावी लागेल.
5) अनाथ आरक्षण लागू करताना शासन तरतूदींचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधीत प्राधिकरणाची राहील.
6) अनाथ आरक्षण हे समाांतर आरक्षण असल्याने आरक्षणाच्या अनुषांगाने सामान्य प्रशासन विभागाचे वेळोवेळी निष्चीत केलेले निकष व अटी अनाथ आरक्षणास लागू राहतील.
“संस्थात्मक” प्रवर्गातील अनाथ बालकांनी प्रमाणपत्र कसे प्राप्त करावयाचे
1.महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या बालकांशी संबंधित संस्थामध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा वयाच्या 18 वर्षानंतर संस्थेतून बाहेर पडलेल्या व अनाथ प्रमाणपत्रासाठीचे निकष पूर्ण करणाऱ्या अनाथाने संबंधित संस्थेच्या अधीक्षकाकडे अनाथ प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा.
2.संबंधित संस्थेच्या अधीक्षकांनी त्या अर्जावरून संबंधित अर्जदाराने ज्या-ज्या संस्थेत वास्तव्य केले आहे. अशा सर्व संबंधित संस्थेच्या अधीक्षकांकडून आवश्यकतेनुसार त्याची माहिती स्वतः उपलब्ध करुन घ्यावी. तसेच अर्जदाराच्या आई-वडीलांचा शोध घेवून, त्यापैकी कोणीही हयात नसल्याबाबतची संबंधित यंत्रणेकडून खात्री करुन घ्यावी.
3) संस्थेच्या अधीक्षकांनी अर्जदाराच्या आई-वडीलांचा शोध घेवून, त्यापैकी कोणीही हयात नसल्याबाबतची संबंधित यंत्रणेकडून खात्री केली असल्याचे तसेच संबंधित अर्जदाराची माहिती व उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निकषानुसार तो अनाथ असल्याचे नमूद करून जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना प्रस्ताव सादर करावा.
“संस्थाबाह्य” प्रवर्गातील अनाथ बालकांनी प्रमाणपत्र कसे प्राप्त करावयाचे
1) नातेवाईकांकडे पालन पोषण होणा-या अनाथ् मुंलानी अनाथ करीता अर्ज स्वतहा कीवा आपल्या नातेवाईकाच्या मार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांना प्रस्ताव सादर करावा.
2.)महिला बाल कल्याण समिती सहज दाखला देणार नाही .त्यात ग्रामंपायत कडुन पुरावा , जन्म-मृत्यू नोंद रजिस्टर , शाळा सोडल्याचा दाखला, गृह चौकशी अहवाल, बाल कल्याण सहमती/बाल न्याय मंडळाचे चे आधीचे आदेश इत्यादी तपासले जाणार.म्हणुनच खोटी माहिती देउ नये.
जर तो बालक खरोखरच अनाथ असेल तर वरील संर्पुन अटी व शर्ती चे पालन करु शकत असेल तर त्याला अनाथाचे प्रमाणपत्र अवश्य मिळणार .
अनाथ चे शासन निर्णय